Posted by: भिर्‍या डोक्याचा | डिसेंबर 28, 2011

सिल्क स्मिता आणि मर्लिन मन्रो

(हा अप्रतिम लेख ‘लोकमत’ वृत्तपत्रातून घेण्यात आला आहे)

सातासमुद्रापल्याडची हॉलीवूडची सिनेतारका र्मलिन मन्रो आणि भारतातील व्हँप चंचला सिल्क-स्मिता म्हणजे सिनेरसिकांच्या दिल की नशिली धडकन होत्या. आत्ताच्या विशी-तिशीतील तरुण पिढीला या दोघींची माहिती असण्याचं काही कारण नाही; पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एकता कपूर निर्माती असणार्‍या आणि आजवर घरंदाज, सोज्वळ भूमिका करणार्‍या विद्या बालनने आपली वस्त्रे उतरवत धिटाईने साकारलेल्या ‘डर्टी पिक्चर’मधील ‘सिल्क’च्या भूमिकेमुळे सिल्क-स्मिताची याद तरो-ताजा झाली आहे.
सिल्क-स्मिता ही ऐंशी-नव्वदच्या दशकांमधील तमिळ चित्रपटातील प्रचंड सेक्स अपिल अस

णारी मदनिका. १९६0 च्या डिसेंबरमध्ये ती जन्माला आली आणि १९९६ च्या सप्टेंबरमध्ये वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी मद्रासमधील (आजचे चेन्नई) स्वत:च्या अपार्टमेंटमध्ये फास घेऊन ही रंगीत दुनिया सोडून कायमची चालती झाली.
सिल्क स्मिताचं खरं नाव विजयालक्ष्मी. आंध्र प्रदेशातील चेलरू या गावात ती जन्मली. घरात प्रचंड दारिद्रय़. पैश्याअभावी इयत्ता चौथीतच तिला शाळेला रामराम ठोकावा लागला. तिच्या रुपड्यावर भाळलेले पुरुष तिच्याभोवती पिंगा घालू लागले म्हणून कमी वयातच आई-वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं; पण नवर्‍यानं आणि सासरच्या मंडळींनी तिला फार छळलं. त्यामुळे विजयालक्ष्मी घरातून पळून चेन्नईला तिच्या मावशीकडे राहायला आली. तिच्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात एक्स्ट्राँच्या गर्दीत उभं राहूनच झाली. बी-ग्रेडच्या छोट्या भूमिका तिला मिळू लागल्या. मग फिल्ममध्ये असतो तस्साच टर्न तिच्याही आयुष्यात आला. चक्क पिठाच्या गिरणीवर बिनू चक्रवर्ती या सिनेदिग्दर्शकाने तिला हेरले आणि स्मिता असे तिचे नामकरण केले. चक्रवर्तीच्या बायकोने स्मिताला इंग्लिश शिकवले. नंतर स्मिता नृत्यही शिकली आणि १९७९ मध्ये एका मल्याळम फिल्ममधून तिनं स्वत:ला पूर्ण एक्स्पोज करून तिच्यातील मदनमंजिरीचे दर्शन आम पब्लिकला घडविले. तेव्हापासून कॅब्रे डान्सर या कॅटेगरीतील भूमिका तिनं साकारायला सुरुवात केली. १९७९ च्या एका तमिळ फिल्ममध्ये तिच्या व्यक्तिरेखेचं नाव ‘सिल्क’ होते. अखेरीस विजयालक्ष्मी या सुरवंटाचे सिल्क-स्मिता या फुलपाखरात रूपांतर झाले.
तेलगू, मल्याळम, कन्नड आणि ‘रेश्मा की जवानी’सारख्या हिंदी चित्रपटातून तिनं बेदरकारपणे केलेल्या देहप्रदर्शनामुळे तिला ‘सॉफ्ट पॉर्न अँक्ट्रेस’ असे संबोधले जाऊ लागले. अनेक भिक्कार सिनेमे जे कायमचे डब्यात गंजत पडले असते त्यांना सिल्क स्मिताच्या उत्तान नृत्याचा स्पर्श होऊन ते बॉक्सऑफिसवर हिट झाले. एकूण साडेचारशे चित्रपटांतून आपल्या मादक अदाकारीने तमाम दक्षिण भारतीय जनतेला घायाळ करत तिने सतरा वर्षं चंदेरी पडद्यावर राज्य केले. बहुसंख्य ‘नीतिमान’ मध्यमवर्गीयांनी आपले संसार एकपत्नी व्रत पाळत सांभाळले असले, तरी त्यांच्या फँटसीच्या दुनियेत ‘शयनेषू रंभा’ सिल्कच होती.
अत्यंत बंडखोरपणे या प्रमत्त प्रमदेने स्वत:चा देह कॅमेरापुढे पेश केला. व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातही तिनं सार्‍याच परंपरांना ठोकरलं आणि बंडखोरीची किंमत मृत्यूला कवटाळून अदा केली. एकदा स्टुडिओमध्ये शिवाजी गणेशन अचानक आले होते. तमिळ सिनेमाचे दैवत आल्यावर सार्‍यांनीच उठून त्यांना मानवंदना दिली. पायावर पाय टाकून बेदरकारपणे बसून राहिली ती फक्त सिल्कच! नंतर तिला विचारल्यावर तिची प्रतिक्रिया खांदे उडवत ‘सो व्हॉट’ अशीच, एवढीच होती.
१९५0-६0 च्या दशकात अशीच एक मिठी छुरी सिनेरसिकांना घायाळ करत होती. तिचं नाव होतं र्मलिन मन्रो. प्लेबॉयपासून ते लाईफपर्यंतच्या मासिकांच्या कव्हरवर आपले न्यूड आणि हाफन्यूड फोटो बिनदिक्कतपणे देऊन चित्रपटात बिकीनीमध्ये वावरून तिनं तहलका मचवला होता. नोबेल पुरस्कार विजेते नाटककार ऑर्थर मिलरपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीपर्यंतच्या पुरुषोत्तमांना तिनं आपल्या मादक अदाकारीनं प्रेमदिवानं करून सोडलं. ‘र्मलिनचं नुसतं हंसगती चालणं पाहण्यासाठी आम्ही ‘नाथगारा’ दहादा-पंधरादा पाहिला,’ असं सांगणारे अनेक बुजुर्ग आजही आपल्याला भेटतात.
१९२६ मध्ये लॉसएंजलीसमध्ये जन्माला आलेली नॉर्मा जीन बेकर म्हणजेच र्मलिन मन्रो. तिच्या जन्म दाखल्यावर आई व पित्याचं नाव होतं; पण पित्याच्या निवासस्थानाचा पत्ताच नव्हता. आईच्या गर्भातही र्मलिन अवतरली होती ते आईबापांच्या घटस्फोटानंतरच. ‘एक नकोशी असणारी अनौरस, अनाथ मुलगी’ असं स्वत:चं वर्णन तिनं केलंय. आई मनोरुग्ण झाल्याने कायमची इस्पितळात दाखल झाली आणि नॉर्माला आईच्या जीवलग मैत्रिणीने ग्रेसने सांभाळायला आणले. सिनेमाचं खूळही ग्रेसनेच नॉर्माला लावले; पण ग्रेसने लग्न केल्यामुळे नॉर्माची रवानगी अनाथालयात झाली. नंतर मग शाळेत जाणार्‍या नॉर्माला परत ग्रेसची आजी ऑलीव्हकडे पाठवलं गेलं. तेथे ऑलीव्हच्या तरुण पोरांनी नॉर्मावर लैंगिक अत्याचार केले. ते घाव पुढील आयुष्यातही नॉर्मा पुसू शकली नाही. नंतरच्या आयुष्यातील तिचं स्वैर लैंगिक वर्तन, निद्रानाश, कुठलंही नातं सांभाळता न येणं, उद्दामपणे शिवीगाळ याची बिजं तिच्या बालपणीच्या अनुभवांत दडलेली होती.
१९४२ मध्ये नॉर्मा परत ग्रेसकडे आश्रयाला आली. अनाथालयात जायला नको म्हणून तिनं शेजारच्या जेम्सला लग्नाची गळ घातली. लग्न होऊन ते एकत्र राहू लागले; पण तोपर्यंत दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि एका व्यापारी बोटीवर जेम्स निघून गेला.
पोट भरण्यासाठी नॉर्माने विमानाचे पार्टस् तयार करायच्या फॅक्टरीत नोकरी धरली. तेथे आर्मी फोटोग्राफर डेव्हीडने तिचे फोटो काढले व ते फोटो ‘चाक’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले. डेव्हीडच्या प्रोत्साहनाने नॉर्माने ब्ल्यू बूक मॉडेलिंग एजन्सीमध्ये नाव नोंदवलं आणि ती एक यशस्वी मॉडेल होऊन डझनभर मासिकांच्या कव्हरवर झळकली. टष्‍द्वेंटिथ सेंच्युरी फोक्स सिनेकंपनीच्या लेऑन या दिग्दर्शकाने तिची स्क्रीन टेस्ट घेतली. लेऑन आणि त्याच्या बायकोनं नॉर्माचं नाव बदलून र्मलिन केलं. र्मलिनने आपल्या आईचे माहेरचे आडनाव मन्रो त्याला जोडून घेतलं. र्मलिन मन्रो हे नाव चंदेरी दुनियेत आजही एक दंतकथा. लिजेण्ड होऊन राहिलं आहे.
र्मलिनने आपल्या भूमिकांसाठी गोल्डन ग्लोब, पारितोषिकांसाठी नॉमिनेशनही मिळवले. ‘समलाईक इट हॉट’ या सिनेमाकरिता तिला बेस्ट अँक्ट्रेस अँवॉर्डही लाभला. तिची ‘नायगारा’तील रोज अविस्मरणीय होती. ‘डायमंडस् आर अ गर्लस् बेस्ट फ्रेंडस्’, डोन्ट बॉदर टू नॉक’ ‘हाऊ टू मॅरी अ मिलीऑनर’, रीव्हर ऑफ नो रिटर्न’, ‘मंकी बिझनेस’ अशा सिनेमांतून आपल्या मादक विभ्रमांनी तिनं दुनियेला भुरळ घातली. तिची तीन लगं्न झाली तीनही लग्नांची परिणती घटस्फोट. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडीं बरोबरच्या प्रेमप्रकरणातील अपयश यामुळे र्मलिन मन्रो प्रचंड एकाकी झाली होती. विसरता न येणारा भूतकाळ, अनाथपणाची मोहर ललाटी लागलेली, तारुण्याच्या उंबरठय़ावरच पोट भरण्यासाठी कॅलेंडरना न्यूड फोटोग्राफ्स देऊन बसलेली ही मदालसा. दारुण निराशा, सततचे मद्यपान, ड्रग्ज, मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेली ट्रँक्विलायझर या सार्‍या विषारी विळख्यात सापडली होती. ‘प्राणावर नभ धरणारा’ कुणी तिला भेटलाच नाही. क्षणभरचा विरंगुळा शोधणार्‍या नरांच्या वासनेची ती शिकार होत राहिली. ट्रँक्विलायझरचा जादा डोस घेऊन तिनं आत्महत्त्या केली, असं म्हटलं जातं. तरीही ती हत्त्या की आत्महत्त्या, असे वादळ तिच्याभोवती आजही घोंगावते आहे. १९६२ च्या जुलै महिन्यात लॉसएंजलीसमधील तिच्या घरी ती मृतावस्थेत सापडली तेव्हा तिचं वय फक्त छत्तीस वर्ष होतं. मरणाआधी तिनं केलेला शेवटचा फोन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना होता. केनेडीबरोबर असणार्‍या सुतावरून ती स्वर्गाला पोहोचली. जॉन केनेडी विवाहित होते. जॅकलीनसारखी सुंदर, बुद्धिमान पत्नी त्यांना लाभली होती. तरीही र्मलिन लग्नासाठीचा तगादा अध्यक्षांच्या मागे लावत होती; पण तिच्या पदरी निराशा व वैफल्यच आले. त्या दु:खातून सावरण्यासाठी ती आधार शोधायला राष्ट्राध्यक्षांचे बंधू रॉबर्ट केनेडीकडे वळली. तिच्या अखेरच्या दिवशीही रॉबर्ट तिला भेटला होता. मात्र, र्मलिनचा मृत्यूच्या आधीचा फोन जॉन केनेडींना आला होता.
सिल्क स्मिता आणि र्मलिन मन्रोच्या आयुष्याची जी शोकांतिका झाली त्याला त्यांचे बालपण, दारिद्रय़, वज्रलेप एकाकीपण, प्रेमबंधातील अपयश, चंदेरी ग्लॅमरस दुनियेची त्यांना पडलेली भुरळ आणि त्यांचं वाहवत जाणं, व्यसनाधीन होणं कारणीभूत ठरलं.
या दोघी जणी गेल्या त्याच चिंचोळ्या घसरणीच्या वाटेने फॅशन, मॉडेलिंग व सिनेजगतातील अनेक जणी मृत्यूच्या खोल दरीत अदृश्य झाल्या. २00२ मध्ये मुंबईत आत्महत्त्या केलेली तेवीस वर्षांची मॉडेल राखी चौधरी, बाविसाव्या मजल्यावरून उडी घेऊन आपला अंत करणारी दिल्लीतील अठरा वर्षांची गायिका सोम्या शर्मा, एकवीस वर्षांची तमिळ अभिनेत्री मोनल, १९९६ मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळालेली तेलगू व हिंदी अभिनेत्री दिव्या भारती, २000 मध्ये प्रेमभंगामुळे आत्मघात करून घेतलेली सत्तावीस वर्षांची अभिनेत्री विजी, एकतीस वर्षांंची मॉडेल नताशा सिंग, नटवरसिंगांची कन्या- एकतीस वर्षांची मॉडेल रितू सिंग या सार्‍या जणींनी स्वत:हून जगाचा निरोप घेतला.
जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केलं आहे की, येत्या दशकात हार्ट अँटॅक किंवा कॅन्सरपेक्षाही दारुण निराशेपोटी आत्महत्त्या केलेल्या स्त्रियांचे प्रमाण अधिक असेल. असहायता, थकवा, निद्रानाश, अकारण होणारी चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, प्रचंड अपराधीपण, भावनिक आधार देण्यास कुणीही नसणं, अंमली पदार्थ व दारूच्या आहारी जाणं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे प्रेमबंधातील अपयश. या सर्वांंमुळे ऐहिक जीवनात यशोशिखरावर असणार्‍या, लक्ष्मीची मेहरनजर असणार्‍या तरुणींची पावलं मृत्यूच्या दरीकडे वळत आहेत. क्वचितप्रसंगी मेंदूतील रासायनिक बदल किंवा कुटुंबात आत्महत्त्येची काही पूर्वपीठिका असणं, अशीही कारणं आत्महत्त्येच्या पाठीमागे असतात.
आपल्याला स्वातंत्र्याच्या नावाखाली भावनिक, आर्थिक आणि लैंगिक स्वैराचार हवा असेल, तर त्याची जबरदस्त किंमत म्हणजे भ्रमनिरास होऊन आत्मघात करून घेणे ठरू शकतो.

-लीना पांढरे

Advertisements
Posted by: भिर्‍या डोक्याचा | जून 8, 2011

A Glass of Water

A Professor decided to teach his students a different lesson one day. Holding a glass of water in his hand, he asked the students, “How much do you think this glass of water weighs?” “500 grams!” came a voice from the back. “600,” said another student. “I don’t really know!” said the professor, holding the glass up to make sure everyone could see it. “And unless we weigh it, we won’t know.” With the glass still in his outstretched hand, the professor continued, “What will happen if I hold it like this for a few minutes?”

“Nothing!” came the reply. “Right, and if I hold it for an hour like this, what might happen?” “Your hand will begin to hurt,” said a student. “Indeed. And what would happen if I held the glass in my hand like this for 24 hours?”

“You would be in tremendous pain,” said one student. “Your hand will probably go numb,” said another. “Your arm will be paralysed and we’ll need to rush you to the hospital!” said a student on the last bench.

“True,” said the professor. “But notice that through all this, the weight of the glass did not change. What then causes the pain?”

The class went quiet. The students seemed puzzled.“What should I do to avoid the pain?” asked the professor. “Put the glass down!” said a student.

“Well said!” exclaimed the professor. “And that’s a lesson I want you to remember. The problems and worries in life are like that glass of water. Think about them for a while and nothing happens. But think about it a bit longer and they begin to hurt. And if you think about them all day long, you will feel paralysed – incapable of doing anything. It’s important to remember to let go of your problems. Remember to put the glass down!”

We may not have been in that classroom that day, but it’s a lesson we would all do well to remember. Put the glass down! Always. It’s not just problems and worries. Sometimes, we feel hurt and betrayed by a friend. And we carry that grudge through our lives. It grows and causes us anguish and pain. Learning to forgive – and forget – is not just good for the other people, it’s great for you. Nelson Mandela spent 27 years in jail and when he was finally freed, you can understand how angry and vengeful he must have felt. But guess what? When he became President, he invited his jailers to be present at the inauguration – in the VIP seats! If he could forgive after 27 years of suffering, surely we can too.

It is the same with our fears too. A failure or an incident in early childhood becomes a deeply entrenched fear over time. Fear of public speaking, fear of Maths, fear of rejection. You name it, and chances are, we have it. Someone gave us that glass to hold when we were little kids – ‘you are clumsy, you are no good, you can’t do it’ – and we have faithfully held on to it all our lives. ‘I can’t’ – becomes a thought that stays in our mind and grows – leading us to complete paralysis. Time to put the glass down!

The story goes that there was a hardworking man who lived a contented life with his wife and children. Every evening when he returned from work, he’d follow a ritual. Outside the door to his house were three nails. On the first one, he’d put his hat. On the second he’d hang his coat. And on the third nail, he’d unwrap an imaginary turban from his head and ‘put’ it there. A friend happened to see this and enquired what he was putting on the third nail every day.

“Those are my problems, my worries and my anger,” said the man. “I have lots of that at work, but when I come home, I remember to take it off – and leave them outside. I don’t take them home with me.” Maybe you should learn to do that too. Starting today. Put the glass down. And see the difference!

Posted by: भिर्‍या डोक्याचा | जून 7, 2011

Breathing Therapy

The nose has a left and a right side; we use both to inhale and exhale.

Actually they are different; you would be able to feel the difference.
The right side represents the sun, left side represents the moon.
During a headache, try to close your right nose and use your left nose to breathe.

In about 5 mins, your headache will be gone? If you feel tired, just reverse, close your left nose and breathe through your right nose.
After a while, you will feel your mind is refreshed.

Right side belongs to ‘hot’, so it gets heated up easily, left side belongs to ‘cold’.

Most females breathe with their left noses, so they get “cooled off” faster.

Most of the guys breathe with their right noses, they get worked up.

Do you notice the moment we wake up, which side breathes faster? Left or right? ?

If left is faster, you will feel tired.
So, close your left nose and use your right nose for breathing, you will get refreshed quickly.

This can be taught to kids, but it is more effective when practiced by adults.

My friend used to have bad headaches and was always visiting the doctor

There was this period when he suffered headache literally every night, unable to study.

Breathing therapy makes U feel relaxed….

He took painkillers, did not work.

He decided to try out the breathing therapy here: closed his right nose and breathed through his left nose.

In less than a week, his headaches were gone! He continued the exercise for one month.

This alternative natural therapy without medication is something that he has experienced.

So, why not give it a try?

Posted by: भिर्‍या डोक्याचा | जून 7, 2011

conversation between a Prof. and a student

Don’t miss even a single word…Every second is worth reading this conversation.. Too good

And it is a real conversation Between a Prof and ______

An atheist professor of philosophy speaks to his class on the problem science has with God, The Almighty.
He asks one of his new students to stand and…..
Prof: So you believe in God?
Student:     Absolutely, sir.
Prof       : Is God good?
Student:     Sure.
Prof: Is God all-powerful?
Student: Yes.
Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him.
Most of us would attempt to help others who are ill. But God didn’t. How is this God good then? Hmm?
(Student is silent.)
Prof: You can’t answer, can you? Let’s start again, young fella. Is God good?
Student: Yes.
Prof:     Is Satan good?
Student: No.
Prof: Where does Satan come from?
Student: From…God…
Prof: That’s right. Tell me son, is there evil in this world?
Student: Yes.
Prof: Evil is everywhere, isn’t it? And God did make everything. Correct?
Student: Yes.
Prof: So who created evil?
(Student does not answer.)
Prof: Is there sickness? Immorality? Hatred? Ugliness? All these terrible things exist in the world, don’t they?
Student: Yes, sir.
Prof: So, who created them?
(Student has no answer.)
Prof: Science says you have 5 senses you use to identify and observe the world around you.
Tell me, son…Have you ever seen God?
Student: No, sir.
Prof: Tell us if you have ever heard your God?
Student:No, sir.
Prof: Have you ever felt your God, tasted your God, smelt your God? Have you ever had any sensory perception of God for that matter?
Student: No, sir. I’m afraid I haven’t.
Prof: Yet you still believe in Him?
Student:Yes.
Prof: According to empirical, testable, demonstrable protocol, science says your GOD doesn’t exist.
What do you say to that, son?
Student: Nothing. I only have my faith.
Prof: Yes. Faith. And that is the problem science has.
Student: Professor, is there such a thing as heat?
Prof: Yes.
Student: And is there such a thing as cold?
Prof: Yes.
Student: No sir. There isn’t.
(The lecture theatre becomes very quiet with this turn of events.)
Student : Sir, you can have lots of heat, even more heat, superheat, mega heat, white heat, a little heat or no heat.      But we don’t have anything called cold. We can hit 458 degrees below zero which is no heat, but we can’t go any further after that.
There is no such thing as cold . Cold is only a word we use to describe the absence of heat
We cannot measure cold. Heat is energy . Cold is not the opposite of heat, sir, just the absence of it .
(There is pin-drop silence in the lecture theatre.)
Student: What about darkness, Professor? Is there such a thing as darkness?
Prof: Yes. What is night if there isn’t darkness?
Student : You’re wrong again, sir. Darkness is the absence of something. You can have low light, normal light, bright light, flashing light….But if  you have no light constantly, you have nothing and it’s called darkness, isn’t it? In reality, darkness isn’t. If it were you would be able to make darkness darker, wouldn’t you?
Prof: So what is the point you are making, young man?
Student: Sir, my point is your philosophical premise is flawed.
Prof: Flawed? Can you explain how?
Student: Sir, you are working on the premise of duality. You argue there is life and then there is death, a good God and a bad God. You are viewing the concept of God as something finite, something we can measure. Sir, science can’t even explain a thought. It uses electricity and magnetism, but has never seen, much less fully understood either one.To view death as the opposite of life is to be ignorant of the fact that death cannot exist as a substantive thing. Death is not the opposite of life: just the absence of it.
Now tell me, Professor.Do you teach your students that they evolved from a monkey?
Prof: If you are referring to the natural evolutionary process, yes, of course, I do.
Student: Have you ever observed evolution with your own eyes, sir?
(The Professor shakes his head with a smile, beginning to realize where the argument is going.)
Student: Since no one has ever observed the process of evolution at work and cannot even prove that this process is an on-going endeavor, are you not teaching your opinion, sir? Are you not a scientist but a preacher? (The class is in uproar.)
Student: Is there anyone in the class who has ever seen the Professor’s brain?
(The class breaks out into laughter.)
Student : Is there anyone here who has ever heard the Professor’s brain, felt it, touched or smelt it? No one appears to have done so. So, according to the established rules of empirical, stable, demonstrable protocol, science says that you have no brain,sir.
With all due respect, sir, how do we then trust your lectures, sir?
(The room is silent. The professor stares at the student, his face unfathomable.)
Prof: I guess you’ll have to take them on faith, son.
Student: That is it sir… The link between man & god is FAITH . That is all that keeps things moving & alive.
NB: I believe you have enjoyed the conversation…and if so…you’ll probably want your friends/colleagues to enjoy the same…won’t you?….
this is a true story, and the
student was none other than……….

Sir. Albert Einstein!

Posted by: भिर्‍या डोक्याचा | जून 6, 2011

No wonder he was!

 

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता……? तर हि गोष्ट आहे….,संत
एक नाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा
मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले.
यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला
शिव्या शाप दिले न काही बोलले.शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :१- नाथ किती महान होते ते कळत२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते३ – माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत४ – एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका५ – रागावून त्रास तुम्हालाच६ – शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच७ – दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे  अशी
एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.
शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून
उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती
त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट
ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….,“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “.शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”.तो
विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे
काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत
पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता
त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध
करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर
वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस
त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि,नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण .  हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता  स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर,,,,,,,,,,,,,,,,


Posted by: भिर्‍या डोक्याचा | जून 6, 2011

अतिथि देवो भव:

पण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, तीचटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथीतृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पणआता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय.अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघडझाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच, “येतो येत्या शनिवारी जेवायला”.
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं  ‘जेवायला येतोय‘  म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहामिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, “तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेलप्रीफरकराल? ‘स्वीकारगार्डन रेस्टॉरंट आहे, ‘अतिथीतलं फूड मस्तच!, ‘सुरभि मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा..”
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.
हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.
अस्सं कस्संतुम्ही आमच्या घरी आलायत नं जेवायला?’
तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, “अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, “वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रहकरून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क ‘घरचंजेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं – मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले :”हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे, व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस…

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची-खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, “आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हांइथल्या “सागरमधलं फूड बाकी…
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त ‘पार्सलचं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पणज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सल परंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेलतर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही “व्वा!म्हणावं तर लगोलग उत्तर येतं – “हे श्रेय माझंनाही. ‘अन्नपूर्णातून आणलंय!
दिवस ‘पार्सलनं सुरू होतो; ‘पार्सलनं संपतो.ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून; चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजीपार्सल, तर रात्री घरी जाताना “आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं ‘रेडीमेड पार्सलआणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्टसुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टूखाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आतानव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणारनाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल..पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेलः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झालेतर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, ‘फॉर अ चेंज’ म्हणून ‘घरीजेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर ‘सुख’ दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले, स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची ‘सोयजर ‘कायमची व्यवस्थाहोत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सल-संस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार!पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात, एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षणपुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर ‘शब्दसुद्धा ‘पार्सलमधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती वतंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं ‘मनव्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतोहेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून ‘पार्सलने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा ‘माझ्यासाठी‘  केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

Posted by: भिर्‍या डोक्याचा | जून 3, 2011

Cricket Stats

Most Centuries:

First-Class – Jack Hobbs 199 (834 matches)

Test – Sachin Tendulkar* 51 (177 matches)

One-Day Int’l – Sachin Tendulkar* 48 (453 matches)

Twenty20 – Brendon McCullum* 02 (40 matches)

WorldCup – Sachin Tendulkar* 06 (06 appearances)

First Centuries:

First-Class – John Small (136) for Hampshire v Surrey at Broadhalfpenny Down in 1775.

Test – Charles Bannerman (165) for Aus v Eng at England in 1877

One Day Int’l –Denis Amiss (103) for Eng v Aus at Old Trafford in 1972

Twenty20 – Chris Gayle* (117) for WI v SA in 2007

WorldCup – Clive Llyod (102) for WI v Aus at Lords, London in 1975

* Active Players

Older Posts »

प्रवर्ग